हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना विषाणुने जगभर थैमान घातलंय. कोरोनामुळे संपुर्ण मानव जातीवरच एक मोठ्ठ संकट ओढवलंय. जगभरातील मृतांचा आकडा २१ हजारांवर पोहोचलाय तर देशात आत्तापर्यंत ६०० हून अधिक रुग्ण सापडलेत. कोरोनामुळे देशात सध्या संचारबंदी लागू आहे. आख्खा देश कोरोनाच्या भितीमुळे लाॅकडाऊन असताना पोलिस मात्र रस्त्यावर आहेत.
कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच आपणा सर्वांच संरक्षण करण्याची जबाबदारी डाॅक्टर, पोलिसांवर आहे. कोरोनाच्या भितीने आपण सर्व घरात असताना आपल्यासाठी कोणी रस्त्यावर असेल तर ते पोलिस आहेत. अशात त्यांच्या कुटुंबियांची काय हालत होत असेल? हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. पप्पा बाहेर जाऊ नका ना? बाहेर कोरोना आहे. असं म्हणुन एक चिमुकला आपल्या पोलिस वडिलांना रडून रडून बाहेर न जाण्याची विनवणी करतोय.
आपले बाबा गुन्हेगारांशी दोन हात करतील मात्र कोरोना नावाच्या या न दिसणार्या शत्रुशी ते कसे लढणार या चिंतेनं हा चिमुकलं धायमोकलून रडतोय. आपला जीव धोक्यात घालून, आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून कोणीतरी आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी रस्त्यावर आहे. तेव्हा मित्र मैत्रिनींनो, दादा आणि दिदिंनो, अक्का, माऊशी, तात्या, आणा हो. कृपा करुन घराबाहेर पडू नका. घरामध्ये राहूयात, कोरोनाशी लढूयात.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”
एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस
कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या
‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…
सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या