हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर ला वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्यातच आता तामिळनाडू भाजप युनिटने मोदींच्या वाढदिवशी जन्मणाऱ्या नवजात बालकाला २ ग्राम सोन्याची अंगठी देण्याचा उपक्रम राबवला आहे. यासोबतच 720 किलो मासळीचेही वाटप करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मत्स्यव्यवसाय आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी सांगितलं की, आम्ही चेन्नईतील सरकारी RSRM रुग्णालयाची निवड केली आहे जिथे पंतप्रधानांच्या वाढदिवसाला जन्मलेल्या सर्व बाळांना सोन्याच्या अंगठ्या दिल्या जातील. प्रत्येक अंगठी सुमारे 2 ग्रॅमची असेल, ज्याची किंमत सुमारे 5000 रुपये असू शकते. ते पुढे म्हणाले की ही विनामूल्य रेवाडी नाही, तर या माध्यमातून आम्ही मोदींच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या बालकांचे स्वागत करू इच्छितो.
दिल्लीतही एका हॉटेलमध्ये ५६ इंच थाळी-
दरम्यान, मोदींच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतही एका हॉटेलमध्ये ५६ इंच थाळी ठेवण्यात आली आहे. दिल्लीतील कनॉट प्लेस येथील ARDOR 2.0 रेस्टॉरंटमध्ये 56 वस्तू असलेली थाळी उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहकांना व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पर्याय असतील. याबाबत रेस्टॉरंटचे मालक सुमित कलारा म्हणाले, की, “मला पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आहे. ते आपल्या देशाची शान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला काहीतरी अनोखी भेट द्यायची आहे. आम्ही ही थाली लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. आम्ही या थाळीचे नाव ’56’ इंच असं ठेवले आहे.