हृदयद्रावक : शाळेतून घरी परतणाऱ्या अपघातातील 6 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | गेल्या महिन्यात 28 मार्च रोजी शाळेतून घरी परतणाऱ्या 6 वर्षाच्या चिमुकलीला भरधाव चारचाकीने धडक दिली होती. या गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीवर पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना फलटण तालुक्यातील बरड येथे घडली होती. शुभांगी ज्ञानेश्वर पिसाळ (वय- 6 वर्षे, रा. बरड, ता. फलटण) असे अपघातात मृत्यू पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुभांगी पिसाळ ही चिमुकली 28 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता बरड गावातील शाळेतून घरी जात होती. त्यावेळी बरड गावातील राणाई मळ्याजवळ भरधाव कारने तिला जाेरदार धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली.

अपघातानंतर तिला तातडीने फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला नातेवाईकांनी उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारादरम्यान तिचा अखेर मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment