मुलगी नाही म्हणून सासू-सुनेने मिळून चिमुकलीचे केले अपहरण

0
30
kidnap girl
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | मुलगा व्हावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आणि त्यासाठी समाजातील अनेकजण नको ते प्रयत्न करतात. प्रत्येकाला वंशाचा दिवा हवा असतो. प्रत्येकजण मुलीला नाकारतात मात्र औरंगाबादेत पोटची मुलगी नाही म्हणून सासू आणि सुनेने तीन वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वनमाला मुन्नालाल शर्मा (वय 52) व राधा रवी शर्मा (वय 27) दोघी (रा. लालबाग झोपडपट्टी, राजीवनगर, देऊळगाव राजा रोड, जालना) अशी अपहरणकर्त्याला सासू-सुनेचे नावे आहेत.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, जालना शहरातील राजू नगर झोपडपट्टीत वनमाला आणि तिची सून राधा शर्मा अवैध दारु विक्री करतात. राधा चार मुलेच आहेत. त्यातील दोन मुले वारली. आपल्याला नात असावी अशी अपेक्षा वनमाला होती. त्यामुळे दोघींनी मिळून मुलीचे अपहरण करण्याचा डाव रचला. त्यासाठी त्या रिक्षाने 12 ऑगस्ट रोजी जालना येथून औरंगाबादला आल्या. रात्री सव्वा बाराच्या सुमारास त्या धूत हॉस्पिटल जवळ पोहोचल्या. तिथे रस्त्यालगत अनेक मजूर मोलमजुरी करून कुटुंबियांसोबत झोपडीत राहत होते. त्यातीलच एका झोपडीत झोपलेल्या तीन वर्षीय चिमुकलीचे त्‍यांनी रिक्षातून अपहरण करून जालन्याला निघून गेल्या.

मध्यरात्री चिमुकलीच्या वडिलांना ती दिसली नसल्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी स्मार्ट सिटीच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज मधून वनमाला आणि राधा यांचा शोध घेतला. व सासू-सुनेला राजु नगरातील लालबाग झोपडपट्टी येथून 20 ऑगस्ट रोजी अटक. करीत सुखरूप सुटका करून तिला तिच्या वडिलांकडे सोपवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here