हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन China Arunachal Pradesh Border। चीनच्या भारताविरुद्ध कुरघोड्या अजूनही कायम आहेत. एकीकडे पाकिस्तान विरुद्धची युद्धजन्य परिस्थिती आता कुठे आटोक्यात आल्यानंतर आता ईशान्य भारतात चीन भारताचा मागे हात धुवून लागलाय. भारत- चीन बॉर्डर वरील अरुणाचल प्रदेशातील काही जागांवर चीनने दावा ठोकला आहे. एवढंच नव्हे तर काही ठिकाणांची नावेही बदलण्याचा नापाक कृत्य चीन कडून करण्यात आलं आहे. भारतानेही चीनच्या या कृत्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चीनचे हे निरर्थक प्रयत्न सत्य बदलू शकत नाहीत, असं म्हणत भारताने ठणकावलं आहे. नेमकं घडलं तरी काय ते सविस्तर पाहुयात.
नेमका काय आहे वाद? China Arunachal Pradesh Border
तर भारत आणि चीनमधील सीमेला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) म्हणतात. मॅकमोहन रेषा भारताच्या अरुणाचल प्रदेशला तिबेटपासून वेगळे करते. परंतु चीन हे मान्य करत नाही आणि अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचं चीन सांगत असते. चीन अरुणाचल प्रदेशला झंगनान म्हणतो, आता तर चीनने सर्व हद्द पार करत अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावेच परस्पर बदलून टाकली (China Arunachal Pradesh Border) आहेत. यापूर्वीही २०२४ मध्ये, चीनने अरुणाचल प्रदेशातील विविध ठिकाणांच्या ३० नवीन नावांची यादी प्रसिद्ध केली होती जी भारताने स्पष्टपणे नाकारली. आताही भारताने चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Our response to media queries on renaming places in Arunachal Pradesh by China (May 14, 2025)
— Randhir Jaiswal (@MEAIndia) May 14, 2025
🔗 https://t.co/5XtzF8ImUJ pic.twitter.com/1edyuqRpog
याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हंटल, आम्हाला असे आढळून आले आहे की अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याचे चीनचे निरर्थक प्रयत्न सुरूच आहेत.मात्र आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार, आम्ही अशा प्रयत्नांना स्पष्टपणे नकार देतो. केवळ रचनात्मक नामकरणामुळे अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे सत्य बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील, असं म्हणत रणधीर जयस्वाल यांनी चीनला ठणकावलं.