जगातील सर्वात ऊंच माऊंट एव्हरेस्टची उंची मोजायला निघालाय चीन; तिबेट मधून केली चढाई

0
126
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वांत उंच पर्वत असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची पुन्हा मोजण्यासाठी चीनची एक सर्वेक्षण टीम बुधवारी तिबेटमार्गे एव्हरेस्टवर पोहोचली. चीनच्या मोजमापानुसार माउंट एव्हरेस्टची उंची ८८४४.४३ मीटर असून ती नेपाळने केलेल्या मोजणीपेक्षा चार मीटरने कमी आहे. १ मेपासून या जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजण्यासाठी चीनने नवीन सर्वेक्षण सुरू केले. नेपाळने केलेल्या एव्हरेस्टच्या उंचीच्या मोजमापावर चीन समाधानी नाही.

सिन्हुआच्या अहवालात असे म्हटले आहे की,’ चीनला जगातील या सर्वोच्च शिखराची उंची मोजण्यासाठी मोहीम राबविण्यास उद्युक्त केले आणि वैज्ञानिकांना असा विश्वास आहे की, ते निसर्गाच्या प्रति मानवाचे आकलन वाढवतील तसेच वैज्ञानिकतेच्या वाढीस चालना देण्यास मदत करतील.

अहवालात असेही म्हटले आहे की, चीनी सर्वेक्षणकर्त्यांनी माउंट एव्हरेस्टवर मोजमाप आणि वैज्ञानिक संशोधनाची सहा चक्रे पूर्ण केली. १९७५ आणि २००५ मध्ये अनुक्रमे ८,८४३.१३ मीटर आणि ८,८४४.४३ मीटर उंचीची नोंद केली.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नेपाळने मार्चमध्ये माउंट एव्हरेस्टसहित हिमालयातील सर्व शिखरे गिर्यारोहणासाठी बंद केली आहेत. चीनी कंपनी हुआवेई ही चायना मोबाईलबरोबर माउंट एव्हरेस्टवर दोन ५ जी स्टेशन्स तयार करण्यासाठी काम करीत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here