भारताने PUBGसह 118 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यावर चीन म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत-चीनमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (९ ऑगस्ट) भारत सरकारने पबजीसह 118 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. त्यावर आता चीनकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. चीनने भारताच्या कारवाईचा विरोध केला असून “मोबाइल अ‍ॅप्सवर भारताने घातलेली बंदी चिनी गुंतवणूकदार आणि सेवा पुरवठादारांच्या कायदेशीर हितांचं उल्लंघन आहे”, असं चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटलं आहे. वृत्तसंस्था Reuters च्या वृत्तानुसार, “चीन या मुद्द्यावर गंभीर असून भारताने आपली चूक सुधारावी”, असंही वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते जी. फेंग (Gao Feng) म्हणाले.

केंद्र सरकारने बुधवारी माहिती व तंत्रज्ञान कायदा 69 A नुसार भारताच्या सुरक्षा आणि सार्वभौमतेला धोका असल्याचं सांगत पबजीसह, लिविक, व्हीचॅट वर्क आणि व्हीचॅट रीडिंग, अ‍ॅपलॉक, केरम फ्रेंड्स यांसारख्या तब्बल 118 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

जूनमध्ये गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्षानंतर आतापर्यंत भारताने ३ वेळा चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. याआधीही भारत सरकारने टिक-टॉक, लायकी, शेअर-इट यांसारख्या 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर केंद्र सरकारने दुसऱ्या टप्प्यात 49 अ‍ॅप्सवर बंदी घातली, आणि आता अजून 118 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. आतापर्यंत एकूण 224 चिनी अ‍ॅप्स भारतात बॅन करण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

Leave a Comment