Paytm च्या IPO येण्यापूर्वी चिनी अधिकाऱ्यांनी दिला कंपनीच्या बोर्डाचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । डिजिटल पेमेंट कंपनी Paytm इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) द्वारे 16,600 कोटी रुपये जमा करण्याची तयारी करत आहे. दरम्यान, सर्व चिनी नागरिकांना कंपनीच्या बोर्डातून काढून टाकण्यात आले असून त्यांची जागा अमेरिकन आणि भारतीय नागरिकांनी घेतली आहे. अँट ग्रुपच्या जिंग झियानडोंग यांनी बोर्डाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याऐवजी आता डग्लस लेमन फेगिन यांना स्थान देण्यात आले आहे. अँट ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष फिजीन हे अमेरिकेच्या कार्यालयात आहेत.

कंपनी जेव्हा शेअर बाजारावर लिस्टिंग होण्याची तयारी करत आहे अशा वेळी Paytm च्या बोर्डातून चिनी नागरिकांना काढून टाकले गेले आहे. अलिपेचे प्रतिनिधी जिंग झियानडॉंग, अँट फायनान्शियलचे गुमिंग चेंग आणि अलिबाबाचे प्रतिनिधी मायकेल युएन झेन याओ (अमेरिकन नागरिक) आणि टिंग हाँग केनी हो यापुढे या कंपनीचे संचालक नाहीत, असे कंपनीने नियामक सूचनेत म्हटले आहे. सुत्रांनुसार Paytm च्या संचालक मंडळावर एकही चिनी नागरिक नाही.

अमेरिकन नागरिक डग्लस लेहमन फेगिन Paytm बोर्डात सामील झाले
अमेरिकन नागरिक डग्लस फेगिन अँट ग्रुपच्या वतीने Paytm बोर्डामध्ये दाखल झाला आहे. बर्कशायर हॅथवेचे प्रतिनिधी टॉड अँथनी कॉम्ब्स, सामा कॅपिटलचे आशित रणजित लिलानी आणि सॉफ्टबँकचे प्रतिनिधी विकास अग्निहोत्री हेही या मंडळामध्ये सहभागी झाले.

Paytm च्या भागधारकांमध्ये अलिबाबाचा अँट ग्रुप (29.71 टक्के), सॉफ्टबँक व्हिजन फंड (19.63 टक्के), सैफ पार्टनर्स (18.56 टक्के) आणि विजय शेखर शर्मा (14.67 टक्के) यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त एजीएच होल्डिंग, टी रोई प्राइस, डिस्कवरी कॅपिटल आणि बर्कशायर हॅथवे यांची 10-10 टक्क्यांपेक्षा कमी हिस्सा आहे.

Paytm 16,600 कोटी रुपयांचा इश्यू आणेल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेटीएम 12 जुलैला भागधारकांची इनिशियल पब्लिक ऑफरद्वारे 16,600 कोटी रुपये जमा करण्यासाठी मान्यता घेऊ शकेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group