मोदींचा हनुमान संकटात ; काकासह पाच खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान  यांच्या निधनानंतर पक्षात उलथापालथ होताना दिसत आहे. पक्षाचे पाच खासदार चिराग पासवान यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिलं आहे. आपल्याला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे पाचही खासदार लवकरच संयुक्त जनता दलात (जेडीयू) प्रवेश करू शकतात.

पशुपती कुमार पारस (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि महबूब अली केशर हे पाच खासदार जेडीयूमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची विनंती केली. अशावेळी बिहारच्या राजकारणात एकाकी पडलेल्या चिराग यांना मोठा झटका बसू शकतो.

बिहार विधानसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षानं स्वतंत्र निवडणूक लढवली. भाजपप्रणित एनडीएमध्ये असूनही लोक जनशक्ती पक्षानं भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या जेडीयूविरुद्ध उमेदवार उभे केले. मात्र भाजपविरोधात उमेदवार न देता त्यांना अप्रत्यक्षपणे मोठी मदत केली. लोक जनशक्ती पक्षाच्या या रणनीतीमुळे जेडीयूचं मोठं नुकसान झालं. जेडीयूच्या तब्बल २३ जागा कमी झाल्या. तर भाजपच्या २१ जागा वाढल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment