हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधीनी दिल्लीतील एका बलात्कार पीड़ित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी या पीडित कुटुंबासोबतचा फोटो ट्विट करून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली होती. मात्र, हा फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला पत्र लिहिले होते. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर टीका केली होती. त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांवर निशाणा साधला.
सर्वज्ञानी संजय राऊत यांना राहुल गांधी यांनी कौतुकाची थाप काय दिली तर त्यावर आपली स्वामीनिष्ठा, परस्वामीनिष्ठा उफाळून येणे स्वाभाविकच आहे. खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे आपलं वागणं खरोखर कौतुकास्पद आहे. पण स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी बलात्कारासारख्या गंभीर विषयाचंही राजकीय भांडवल करणं हे निंदनीय आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.
सर्वज्ञानी @rautsanjay61 ji राहुलजी गांधी यांनी कौतुकाची थाप काय दिली त्यावर स्वामीनिष्ठा परस्वामीनिष्ठा उफाळून येणं स्वाभाविकच
खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं?हे आपलं वागणं कौतुकास्पद पण स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी बलात्कारासारख्या गंभीर विषयाचंही राजकीय भांडवल करणं हे निंदनीयचं pic.twitter.com/z6mhi44DeV— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 9, 2021
“पूजा चव्हाणाच्या मारेकऱ्यांना कोण अभय देत आहे आणि पुणे पोलिसांची त्यात कशी भूमिका राहिली आहे, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. नव्या अभिनेत्रीला संधी देतो म्हणून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला आत्ताच लोकांनी चोप दिला,” असं त्या म्हणाल्या आहेत.
आपल्या अत्याचाराविरुद्ध सुद्धा राज्यातील एका भगिनी न्याय मिळण्याकरिता उच्च न्यायालयात दाद मागतीये आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत, आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत आम्ही या अत्याचारविरोधात अन्यायाविरोधात या विकृतीविरोधात लढतोय व लढत राहू. त्यामुळेच की काय आपल्याला भितीपोटी असे दाखले द्यावे लागतात असेही वाघ म्हणाल्या आहेत.