हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या ‘पेनड्राइव्ह’ ची चौकशी सीआयडी करेल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत केली आहे. तसेच या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप आहे ते विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांनी राजीनामा दिला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
प्रत्येक केस ही सीबीआयकडे द्या अशी मागणी करणे हे बरोबर नाही. महाराष्ट्रातील पोलीस दलावर तुमचा विश्वास नाही का? असा सवाल करत हे संपूर्ण प्रकरण आपल्याला तपासावं लागेल. यामागे कोण दोषी आहे त्याच्यावर काय कारवाई करायची हे पहावं लागेल असे वळसे पाटील यांनी म्हंटल .आपण सतत पेन ड्राइव्ह देत आहात, आपण काही डिटेक्टिव्ह एजेंसी काढली आहे का?, असा सवाल विचारत वळसे पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला.
काय आहे फडणवीसांचा पेनड्राइव्ह बॉम्ब-
विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडीओचा पेन ड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातून होत आहे असा आरोप फडणवीसांनी केला होता. . प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे असेही त्यांनी म्हंटल