Thursday, October 6, 2022

Buy now

मित्रासोबत फोटो काढण्याचा मोह जीवावर बेतला

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – हल्ली तरुणांमध्ये सेल्फी आणि फोटोशूटची मोठी क्रेझ आहे. हे लोक धबधबे, बंधारे, नदी किंवा समुद्र किनारा, तलाव या ठिकाणी जाऊन आपला फोटो क्लिक करतात आणि सोशल मीडियावर अपलोड करतात. मात्र कधी कधी या ठिकाणी फोटो काढण्याचा मोह जीवावर देखील बेतू शकतो. अशीच एक घटना जळगावमधील एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. या घटनेत या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या तरुण मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत तरुणाचे नाव शुभम असून तो घटनेच्या दिवशी आपल्या पाच मित्रांसोबत दुपारी कांताई बंधाऱ्यावर फिरण्यासाठी गेला होता. मृतक मुलगा हा खूप आनंदी होता. तो खूप उत्साहात होता. त्याच उत्साहात त्याला बंधाऱ्यावर फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. पण त्याचा हाच मोह त्याच्या जीवावर बेतला. यावेळी बंधाऱ्यावर फोटो काढत असताना अचानक शुभमचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला त्याच्याबरोबर आणखी एका मित्राचा पाय घसरला आणि तोही पाण्यात पडला. यावेळी त्यांच्या मित्राने दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचवण्यात यश आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी युद्ध पातळीवर तरुणाचा मृतदेह शोधण्याचं काम सुरु केले व पुढील तपासाला सुरुवात केली. या मृत तरुणाच्या पश्चात दोन बहिणी, आई-वडील आणि आजोबा असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.