औरंगाबाद : लग्नाच्या सहा महिन्यातच माहेरहून पैसे आणण्यासाठी पतीने बेल्टने मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. याप्रकरणी एका अभियांत्रिकीच्या प्राध्यापकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको एन-4 मध्ये राहणाऱ्या प्राध्यापकांच्या पत्नीने अकोला पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तेथे झिरो अंतर्गत गुन्हा दाखल करून पुंडलिकनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
26 वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, 28 वर्षीय प्राध्यापक अनुरागसोबत जून 2020 मध्ये तिचा विवाह झाला होता. टू सेव्हन हिल्स परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असून त्याची आई देखील त्याच महाविद्यालयात नोकरीस आहे. उच्चशिक्षित कुटुंबात पतीने माहेरुहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला.
त्यासाठी मारहाण करणे, अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. याप्रकरणी अकोला पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तेथील पोलिसांनी प्राध्यापकावर अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी कलम 377, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी कलम 498, मारहाण प्रकरणी कलम 323 अंतर्गत पती व सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.