अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकलूज प्रतिनिधी | आठवडे बाजारात शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनीच पकडून चोप दिल्याची घटना आज अकलूजमध्ये घडली आहे. अकलूज येथील दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात मागील काही दिवसापासून शेळ्यांची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. त्या टोळीचा पर्दा फाश करत त्यांना विवस्त्र करून नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे.

अकलूज परिसरात रानात चरणाऱ्या शेळ्या चोरून अकलूजच्या बाजारात आणून विकायच्या आणि त्यातून येणाऱ्या पैशावर गुजराण करायची असा उद्द्योग या चोरांनी आरंभला होता. त्यांची टोळी एवढी सतर्क होती की चोरी करताना कोणत्याही प्रकारचा पुरावा मागे सोडत नव्हती. म्हणून नागरिकांनीच या टोळीच्या तपासाची धुरा हाती घेतली आणि या टोळीला पडकण्यास यश आले. चोरांना नग्न करून चोप दिल्यानंतर नागरिकांनी त्यांना पोलीसांच्या स्वाधीन केले.

दरम्यान अकलूज परिसरात पाळीव जनावरे चोरीला जाण्याची हि काही पहिली वेळ नाही. या आधी देखील अशा प्रकारच्या चोऱ्या झाल्या आहेत. मात्र अशा चोऱ्यांची फिर्याद घेऊन पोलीस ठाण्यात गेल्यास पोलीस प्रशासन दाद देत नव्हते. म्हणून या प्रकारात देखील नागरिकांनी स्वतः चोर पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले आहेत. पाळीव जनावरे पळवण्याच्या घटना या परिसरात सतत घडत असल्याने पोलीसांनी या सर्व प्रकारात गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे येथील नागरिकांनी म्हणले आहे.

 

Leave a Comment