शहर स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र्र देशात पहिल्या स्थानी; ‘या’ शहराला मिळाला बहुमान

Clean City Survey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र राज्य हे भारतातील असे राज्य आहे जिथे विविधता नांदते. अनेक जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाणे राहतात. वेळ पडली तर सर्वजण आपसातील मतभेद विसरून एकत्र येतात आणि आम्ही एक असल्याची जाणीव करून देतात. भाषा, संस्कृती आणि इतिहासाच्या बाबतीत तर महाराष्ट्र पुढे आहे. अश्या या महाराष्ट्राने आज स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा पहिले स्थान पटकावले आहे.

केंद्र सरकारने जारी केली लिस्ट

2023 मधील स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल केंद्र सरकारने जारी केला. त्यामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल असलेल्या शहरांची नावे सांगण्यात आली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या सासवड शहराला देशातील सर्वात स्वच्छ शहराचे मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा जसा संस्कृतीने पुढे तसाच तो आज स्वच्छतेतही समृद्ध झाला आहे.

नवी मुंबईला तिसरं स्थान –

स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल क्रमांक पटकवलेले शहर म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या सासवड शहराने पहिला क्रमांक मिळवला आहे. तर एक लाखापेक्षा आधी संख्या असलेल्या इंदुर शहराने सातव्या क्रमांकाचे मानचिन्ह मिळवले आहे. तर महारष्ट्राच्या स्वप्न नगरीने म्हणजेच नवी मुंबईने तिसरे स्थान मिळवले आहे. तसेच भोपाळने सहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. महाराष्ट्रातील सासवड, नवी मुंबई या शहराने पहिला आणि तृतीय क्रमांक मिळवल्यामुळे आपला महाराष्ट्र देशात स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल ठरला आहे. तसेच यामध्ये लोणावळा, पिंपरी चिंचवड, कऱ्हाड, पाचगणी, विटा यासारख्या शहराचाही समावेश आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशमधील महूला सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा तर सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सुरक्षित शहर पुरस्कार चंदीगडला देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मानले स्वछता कर्मचाऱ्यांचे आभार

महाराष्ट्राला स्वच्छ राज्य म्हणून सन्मानित करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वछता कर्मचाऱ्यांचे आभार मानत सांगितले की, आज राज्याला मिळालेला पहिला क्रमांक हा केवळ आणि केवळ स्वछता कर्मचाऱ्यांमुळे मिळाला आहे. स्वछता प्रेमी असलेले नागरिक आणि स्वछतेच्या बाबतीत लागलेल्या हाताचे योगदान हेच आजच्या सन्मानाचे खरे मानकरी आहेत. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे.