कोल्हापूर प्रतिनिधी। सतेज औंधकर
देशावर जीवघेण्या कोरोनाच संकट आहे. अशा नाजूक आणि धोकादायक परिस्तितीत सुद्धा डॉक्टर, पोलीस, इतकेच काय सफाई कर्मचारी जीव मुठीत धरून तुमच्या-आमच्यासाठी आपलं कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळं लोकडाऊनच्या काळात शहराची स्वछता आपल्या खांद्यावर घेणारे आरोग्य कर्मचारी खऱ्या अर्थाने हिरो ठरत आहेत. अशी कृतज्ञतेची भावना मनात बाळगून आज कोल्हापूरकरांनी कचरा उचलणाऱ्या कामगाराचा हार घालून सन्मान केला.
अंबाबाई मंदिर परिसरात कचरा गोळा करणारे घंटागाडी कर्मचारी मारूती घाडगे हे आपले दैनंदिन कर्तव्य बजावण्यासाठी परिसरात आले होते. दरम्यान अचानक परिसरातील नागरिक मार्फत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. काही क्षणासाठी त्यांना नेमकं काय घडत आहे हे कळतच नव्हते. मात्र, दुसऱ्या क्षणाला जे घडलं ते त्यांच्या कायम स्मरणात राहील असं घडलं. परिसरातील नागरिकांनी त्यांच्या कामाची जण ठेवत त्यांचा शाल देऊन सन्मान केला.
आजपर्यंत नेहमी उपेक्षित आणि काहीशी दुय्यम वागणूक मिळण्याचा अनुभव असलेले घाडगे नागरिकांच्या कृतज्ञतापूर्ण वागणुकीने भारावून गेले. तर दुसरीकडे कोल्हापूरातच पाटाकडील तालीम या भागात सफाई कर्मचाऱ्यांच्या गळ्यात लोकांनी चक्क नोटांचा हार घालून, सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली. सिनेमाच्या थियटरमध्ये नोटा उडवणारे कोल्हापूरकरच आणि माणूस म्हणून सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेत गळयात नोटा घालणारे सुद्धा कोल्हापूरकरचं. तेव्हा कोल्हापूरकरांचा नादच खुळा! असंच म्हणावं लागेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??
कोविड -१९ च्या लसीची उंदीरांवर यशस्वी चाचणी; जाणून घ्या
लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय
६ CRPF जवानांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह
करोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख देणार- अजित पवार