सातारा जिल्ह्यात वातावरणात बदल, कराडला पावसाची रिपरिप सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | गेल्या दोन दिवसापासून हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. कराड शहरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील वातावरणात बदल झालेला असून काही ठिकाणी पावसाने सुरूवात केली आहे.

कराड शहरात सकाळ- सकाळी पावसाने हजेरी लावल्याने फिरायला येणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या पडत असलेला पाऊस काही भागात पडत आहे, तर काही भागात पडत नसल्याने लोकांना बाहेर पडताना पावसाचा अंदाज लागत नाही. परंतु सर्वत्र वातावरणातील बदल पहायला मिळत आहे.

अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत

काल महाबळेश्वर, पाचगणी येथे पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक येत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच ऊस तोडणीला यांचा फटकाही बसणार आहे. महाबळेश्वर, पाचगणी भागात स्ट्राबेरी पिकाला यांचा फटका बसला आहे. तर सध्या नुकतीच बाजारात दाखल होत असलेल्या द्राक्ष बागेलाही फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.