सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या कोरोशी गावात धगफुसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे सोळशी नदीवरील तापोळ्याला जाणारा पूल पावसाच्या पाण्याने वाहून केला आहे. त्यामुळे 105 गावांचा संपर्क तुटला आहे. सावरी, म्हावशी या गावातील डोंगरकडा कोसळून रस्त्यावर भल्यामोठ्या दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यात चार दिवसांपासूनमुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुले जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नदी, ओढ्याना पूर आला असल्यामुळे या ठिकाणच्या गावांचा व वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तर कुणाची जनावरे, शेती, पिकेच वाहून गेली आहेत. त्यांच्याकडून प्रशासनाकडे मदतीची याचना केली जात आहे.
सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागातही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या भागातील अनेक गावांचे ओढे तसेच नदीवरील पुलच वाहून गेले आहेत. तर अतिवृष्टीमुळे विदुत पुरवठाही खंडिट झालेला आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागात असलेल्या कोरोशी गावात धगफुसदृश्य पाऊस कोसळला असून सोळशी नदीवरील तापोळ्याला जाणारा पूल पावसाच्या पाण्याने वाहून केला आहे. त्यामुळे 105 गावांचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या वतीने मदतकार्य पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.