अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; 5 भाविकांचा मृत्यू भयंकर व्हिडिओ आला समोर

Cloudburst
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पवित्र अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी (Cloudburst) झाल्याची घटना समोर आली आहे. ढगफुटीनंतर (Cloudburst) पाणी वाढल्यामुळे अनेक भाविक या पाण्यामध्ये अडकले आहेत. या भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचाव दल पोहोचले आहेत. या भयंकर ढगफुटीचा (Cloudburst) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या ढगफुटीत (Cloudburst) पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेत अजून लोक मृत पावले असण्याची शक्यता आहे. अमरनाथ गुहेजवळ मोठ्या संख्येने भाविक जमा झाले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. अमरनाथमध्ये पवित्र गुहेजवळ संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हि ढगफुटी (Cloudburst) झाली आहे.

ज्यावेळी हि ढगफुटी (Cloudburst) झाली त्यावेळी गुहेजवळ 10 ते 15 हजार भाविक उपस्थित होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत 5 ते 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र जम्मू-काश्मीर पोलिसांनी दोन लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. हिमालय रांगातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भाविकांसाठी लावलेले 25 टेंट आणि दोन लंगर पाण्यात वाहून गेले आहेत. जोरदार पावसामुळे या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार