हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Clove Water Benefits) जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या खडा मसाल्यांमध्ये छोटीशी लवंग असते. जिचे गुण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायी असतात. दातदुखीसाठी तर बहुतेक लोक लवंगचा वापर करतात. पण बऱ्याच लोकांना माहित नाही की, लवंग केवळ दातदुखीवर नव्हे तर आणखी बऱ्याच आजरांवर रामबाण उपाय ठरू शकते. यासाठी नियमित रिकाम्या पोटी लवंगाच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे मिळणारे फायदे वाचून तुम्ही नक्कीच चकित व्हाल! चला जाणून घेऊया लवंग पाणी पिण्याचे फायदे.
रोगप्रतिकार शक्तीत वाढ
आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे असते. तसे नसल्यास आपण बऱ्याचदा आजारी पडू शकतो. पण नियमित लवंगाचे पाणी प्यायल्यास कोणताही संसर्ग किंवा ऍलर्जीचा धोका कमी होतो. (Clove Water Benefits) लवंगातील व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मँगनीज आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात आणि त्यामुळे संसर्गाची भीती राहत नाही.
पचनक्रिया सुधारते (Clove Water Benefits)
अनेकांना अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. अशा लोकांसाठी लवंग मोठी फायदेशीर ठरते. कारण लवंगात असणारी खनिजे पाचक एंझाइमचे उत्पादन उत्तेजित करतात. त्यामुळे रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
त्वचा होते तजेलदार
सनबर्न, मुरूम यांसारख्या समस्यांनी वैतागलेल्या लोकांसाठी लवंगाचे पाणी वरदान ठरू शकते. कारण लवंग हे अँटी-एजिंग, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते. (Clove Water Benefits) त्यामुळे लवंगाचे पाणी प्यायल्यास त्वचेसंबंधित समस्या दूर होऊन त्वचा तजेलदार होते.
सूज उतरते
लवंगमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. जे शरीरातील सूज कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे ज्यांना सांध्यांना सूज येणे, जळजळ होणे यासारख्या समस्या असतील त्यांनी दररोज लवंगाचे पाणी प्यावे.
तोंडाच्या समस्या होतील दूर
तोंडाशी संबंधित विविध समस्यांवर लवंग फायदेशीर आहे. (Clove Water Benefits) दातदुखी, उष्णतेचे व्रण, तोंडाची दुर्गंधी अशा सर्व समस्यांवर लवंग प्रभावीपणे काम करते. कारण लवंगात अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे तोंडाची स्वच्छता राखतात आणि बॅक्टेरियाशी लढतात. त्यामुळे अशा समस्यांनी ग्रस्त लोकांनी दररोज लवंगाच्या पाण्याचे सेवन करावे.