राजस्थान: गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला; सचिन पायलट म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. राजस्थान विधानसभेतील विरोधी बाकावरील भाजपने आणलेल्या विश्वासदर्शक ठरावावर विधानसभेत आवाजी मतदान घेण्यात आलं. अशोक गेहलोत सरकारने विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान विधानसभा अधिवेशन २१ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

सचिन पायलट यांनी बंड पुकारल्याने काही दिवसांपूर्वी गेहलोत सरकारवर अस्थिरतेच्या सकंट निर्माण झालं होत. दरम्यान, सचिन पायलट पुन्हा पक्षात परतल्याने गेहलोत सरकारवरील अस्थिरतेचं संकट टळलं होतं. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सचिन पायलट यांनी आपण चांगल्या बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकलो असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. विरोधकांनी अनेक प्रयत्न करुनही आमच्या सरकारच्या बाजूने निर्णय लागला असल्याचंही ते म्हणाले आहेत. याशिवाय भाजपा नेत्यांनी यावेळी काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर सचिन पायलट यांनी विरोधकांनी आमच्यातील मतभेदांमध्ये न पडता विश्वासदर्शक ठरावावर लक्ष द्यावं असा सल्ला दिला.

विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काहीही झालं तरी आपण राज्य सरकार पडू देणार नाही असा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपा सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला. “अमित शाह नेहमी निवडून आलेली सरकारं कशी पाडावी याचीच स्वप्नं पाहत असतात. पण आम्ही हे सरकार पडू देणार नाही,” असंही अशोक गेहलोत यांनी यावेळी सांगितलं. “तुम्ही लोकांनी कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशात जे झालं त्याची चिंता केली पाहिजे. देशभर लोकशाहीची खिल्ली उडविली जात आहे” “तुमचे पक्षप्रमुख किंवा हाय कमांड यांनी कितीही प्रयत्न केले तरी मी हे सरकार पडू देणार नाही,” असं यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांना सुनावलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”