मुख्यमंत्र्यांचे अनाधिकृत बांधकामांना अभय? : म्हणतायत “मुद्दा तपासू, तातडीने कारवाई नाही”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

आपल्याला पर्यटन वाढवायचे आहे, पण पर्यावरणही जपायच आहे. कुणावरही अन्याय होणार नाही, परंतु लोकांनीही सहकार्य करावे. पर्यटन आणि पर्यावरणाचा बॅलन्स करायचा आहे. शेवटी सर्व ग्रामस्थ आपले आहेत. त्यामुळे तातडीने कुणावर अन्याय होईल, असे सरकार काही करणार नाही. सरकार गोरगोरीबांचे आहे. त्यांची रोजीरोटी जाईल असेही करणार नाही, असे म्हणत अतिक्रमण असलेल्या बांधकामांना आता अभय मिळणार असल्याचे संकेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

महाबळेश्वर येथे दाैऱ्यावर मुख्यमंत्री होते. यावेळी कास पठार त्याचबरोबर पाचगणी, महाबळेश्वर येथील अनाधिकृत बांधकाम केलेली असून अतिक्रमण करण्यात आलेली आहेत, त्या लोकांना नोटीसा दिलेल्या आहेत. यावर बोलताना मुख्यमंत्री यांनी तातडीने कोणावरही कारवाई केली जाणार नाही. तसेच लोकांची रोजीरोटी जाईल असेही वागणार नसल्याचे म्हटले आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बन्सल यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अनाधिकृत अतिक्रमण बांधकाम संदर्भात सर्व बाबी तपासून पाहू. ग्रामस्थ आपलेच आहेत. त्यामुळे दोन्ही बाजू तपासून पाहू. आता कुठेही कधीही पाऊस पडतो, अतिवृष्टी, अवकाळी होते. ग्लोबल वार्मिंग, हवामानातील बदल या गोष्टीचा बॅलन्स करणे गरजेचे आहे. लोकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे.