हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर मिळणारी नुकसान भरपाई आता दुप्पट होणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे झाले असून जवळपास १५ लाख हेक्टर पर्यंत शेतीचे नुकसान झालं आहे . यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी NDRF च्या नियमापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई सरकार देईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर २ हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही ती ३ हेक्टर केली आहे ज्यामुळे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल. NDRF च्या नियमानुसार ६८०० रुपये मिळत होते मात्र आता याच्या दुप्पट पैसे आम्ही शेतकऱ्यांना देऊ असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.
दरम्यान, मेट्रो ३ च्या वाढलेलय किमतीला आज मंजूरी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकल्पाचा मूळ खर्च 23 हजार 136 कोटी होता तो आता 33 हजार 405 कोटी 82 लाख रुपयांचा होईल असे फडणवीस म्हणाले. या प्रकल्पाच्या वाढीव खर्चात केंद्र शासनाचा सहभाग मिळण्याकरिता देखील केंद्र शासनास विनंती करण्यात येत आहे. या प्रकल्पाची 85 टक्के कामे पूर्म झाली आहेत. तर कार डेपोचं काम 29 टक्के पूर्ण झालेले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
https://www.facebook.com/mieknathshinde/videos/1193542274552182/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C-GK2C