हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील फडणवीस- शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपा बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आषाडी एकादशी नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, कालची अमित शाह यांच्यासोबतची भेट ही सदिच्छ भेट होती. ही राजकीय भेट नव्हती. नव्या सरकारचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही दिल्लीत आलो आहे. मंत्रिमंडळाचे खातेवाटप हे आषाडी एकादशी नंतर होईल. मी आणि देवेंद्र फडणवीस उद्या आषाडी एकादशीला जाईन. त्यानंतर मुंबईत आम्ही बैठक घेऊन चर्चा करू आणि मंत्रिमंडळ खातेवाटप बाबत निर्णय घेऊ असं शिंदे म्हणाले.
आमचा गट हीच खरी शिवसेना आहे असा पुनरुच्चारही एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणं ही दिशाभूल करणारी वक्तव्य आहेत. महराष्ट्राचे तुकडे होणार असी कोणताही चर्चा झाली नाही. काही जणांकडून दिशाभूल करण्यासाठी अशी विधानं केली जाते, पण जनता सुजाण आहे अस शिंदे म्हणाले.