NDRF पथके सज्ज ठेवा, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

0
293
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जर पावसाचा जोर वाढला तर पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत एनडीआरएफ जवानांना तसंच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी. तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत.

मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत .कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे.

याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे,प्रसंगी त्यांना हलविणे करणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागांना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here