हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोड वर असून आज ते गडचिरोली दौऱ्यावर गेले आहेत. सध्या राज्यभर पावसाने जोर धरला असून त्याच पार्श्वभूमीवर गडचिरोली येथील पूरग्रस्त भागाची पाहणी शिंदे करतील. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा असतील.
गडचिरोली जिल्ह्यात दमदार पावसाने मोठं नुकसान झालं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे तात्काळ गडचिरोलीला रवाना झालेत. पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता पूर परिस्थितीबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन सोबत आढावा बैठक घेणार आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री राहिलेले होते. त्यांना तेथील भौगोलिक परिस्थितीची चांगली जाण आहे. आता ते थेट मुख्यमंत्री म्हणून गडचिरोली ला गेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गडचिरोली साठी मोठी घोषणा करतात का हे पाहावं लागेल.