सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
महाराष्ट्राचं मिनी कश्मीर ज्याला म्हटलं जात ते महाबळेश्वर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळं फुल्ल झालेलं पाहायला मिळतय. दिवाळी नंतर येणा-या सुट्ट्यां मध्ये महाबळेश्वर ची आल्हाददायक गुलाबी थंडी अनुभवत पर्यटक पर्यटनाचा आनंद घेताना पाहायला मिळतायेत. मात्र महाबळेश्वर मध्ये झालेली पर्यटकांच्या गर्दीमुळे या ठिकाणी ट्राफीक जाम ची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली असुन शुक्रवारी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांना या ट्राफिक जाम चा सामना करावा लागलाय.
महाबळेश्वर मधील वेण्णालेक परिसरात झालेल्या ट्राफीक जाम मुळं सुमारे दिड तास मिसेस मुख्यमंत्री अडकुन पडल्या होत्या. यामुळं मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाच ट्राफिक जामचा असा सामना करावा लागत असेल तर सामान्यांची काय हाल होत असतील असा प्रश्न पर्यटक उपस्थित करतायेत. वेण्णालेक परिसर हा नौका विहारासाठी प्रसिद्ध आहे यामुळं याठिकाणी पर्यटकांची चांगलीच रेलचेल असते. पाचगणी कडुन येणारं ट्राफीक आणि नौका विहार ,घोडे सवारी साठी आलेले पर्यटक यांच्यामुळं या ठिकाणी कायमच ट्राफीक जाम होत असतं यामुळं यावर पर्यायी रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे.
वास्तवीक पाहायला गेलं तर या ठिकाणी जादा ट्राफिक पोलीसांची गरज असताना सुद्धा दोन पोलीस ट्राफीक कंट्रोल करत असतात. यामुळं या ठिकाणी सावळा गोंधळ निर्माण होतो आणि पर्यटक तासन तास अडकुन पडतात. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी महाबळेश्वरच्या ट्राफिक मध्ये अडकुन पडनं हे त्याच ताज उदाहरण आहे. यामुळं लवकरात लवकर पर्यायी रस्ता व्हावा तसंच सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये जादा ट्राफिक पोलिसांची कुमक या ठिकाणी ठेवावी ही मागणी पर्यटक आणि महाबळेश्वरकरांची असल्याचं पाहायला मिळतय