राहुल गांधींनी आदिवासी समुदायासोबत केलं नृत्य; पहा Video

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना भेटत आहेत. राहुल गांधी लोकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या त्यांची भारत जोडो यात्रा तेलंगणात असून आज त्यांनी आदिवासी समुदायांसोबत नृत्य केले आहे. स्वतः राहुल गांधी यांनी याबाबतच एक व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून शेअर केला आहे.

आपले आदिवासी हे कालातीत संस्कृती आणि विविधतेचे भांडार आहेत. आज कोमु कोया आदिवासी नर्तकांसोबत स्टेप बाय स्टेप डान्स करण्याची संधी मिळाली. आदिवासी समाजाची कला त्यांची मूल्ये व्यक्त करते. अशा वेळी त्यांची कला आणि संस्कृती जतन करण्याबरोबरच ती शिकली पाहिजे असेही राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, कन्याकुमारी पासून सुरु झालेल्या भारत जोडो यात्रेचा तेलंगणा राज्यात आज चौथा दिवस आहे. राहुल गांधी आणि त्यांची टीम आज 20 किलोमीटरहून अधिक अंतर चालेल. राहुल गांधी आज संध्याकाळी जडचेर्ला एक्स रोड जंक्शन येथे कोपरा सभा घेत जनतेला संभोधित करतील. तेलंगणात भारत जोडो यात्रा 19 विधानसभा आणि 7 लोकसभा मतदारसंघाना कव्हर करेल. यादरम्यान 375 किमीचा प्रवास केला जाईल. तेलंगणातून १५ नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल.