अहमदनगर प्रतिनिधी । काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आता शिर्डी मतदारसंघातूनच भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. अहमदनगरमधील कोपरगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी, ‘भाचीला मोठ्या मताधिक्यान निवडून आणा’, असा सूचना वजा आदेश मुख्यमंत्र्यांनी विखे पाटलांना दिला.
भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाची अर्थात कोपरगावमधील भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं आश्वासन दिलं. मात्र त्याच मतदारसंघात विखेंचे मेहुणेही अपक्ष उभे असल्यामुळे त्यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात भाची अर्थात भाजप उमेदवार असलेल्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहणार असं आश्वासन दिलं. तो धागा पकडत मुख्यमंत्र्यांनीही विखे पाटलांना कोल्हे यांना मोठ्या मताधिक्क्यान निवडून आणण्याची जबाबदारी दिली. भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केलं.
इतर काही बातम्या-
‘पवारांना हा पाटील कोण आहे हे अजून ओळखता आला नाही’ – चंद्रकांत पाटील
वाचा सविस्तर – https://t.co/ixmplrG0JX@ChDadaPatil @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra @BJP4India #Vidhansabha2019 #MaharashtraAssemblyElections
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019
भाजप सरकार हे धनदांडग्याचं; वनजमीन हडपण्याचा सरकारचा डाव – सीताराम येचुरी
वाचा सविस्तर – https://t.co/iRR78oiNKf@cpimspeak @SitaramYechury @CPIM_WESTBENGAL @BJP4India @PMOIndia #development #ModiHaiToMumkinHai
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019
पंढरपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं चाललंय काय? दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा विरोधात प्रचार सुरूच
वाचा सविस्तर – https://t.co/8vLCfLEPxw@INCMumbai @IYC @NCPspeaks #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019