मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज १५ जानेवारी रोजी मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या(मुंबई ट्रान्स हार्बर लिंक)समुद्रातील पुलाच्या पहिला गाळा उभारणी कामाचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,खासदार अरविंद सावंत,आमदार अजय चौधरी उपस्थित होते. या पुलाची लांबी २२ किमी असून हा देशातील समुद्रावरील सर्वात जास्त लांबीचा पूल ठरणार आहे.
मुंबई पारबंदर प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. हा प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या (JICA) कर्ज सहाय्याने राबविण्यात येत आहे.
या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ कि.मी. असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे. एकूण २२ किमी लांबीचा पूल हा देशातील सर्वात जास्त लांबीचा समुद्रावरील पूल ठरणार आहे.