Pm Kisan च्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री किसान योजना लागू होणार; शेतकऱ्यांना मिळणार मोठा लाभ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्यातही शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकार लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षाला ६ हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्या टप्प्यानं रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. कृषी विभागासोबतच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आता राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.