हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कारोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाइव्ह आले आहेत. त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे, लसिकरणाविषयी बोलताना जनतेला विश्वास दिला की, राज्य सरकार 18-44 वयोगटातील जनतेला मोफत लस देण्याकरिता सक्षम आहे. आणि लवकरच लसीकरण सुरू करण्यात येईल. लसी उपलब्ध होतील तसे लसीकरण करण्यात येईल.
याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘राज्याकडे सध्या 18 ते 44 या वयोगटातील जनतेचे लसीकरण करण्यासाठी तीन लाख लसी सध्या राज्यकडे उपलब्ध आहेत. यामुळे या वयोगटातील लोकसंख्या पाहता हा आकडा खूपच कमी आहे. परंतु आपण जशा पद्धतीत लसी उपलब्ध होतील त्या प्रमाणात लसीकरण आपण सुरू ठेवणार आहोत’.
केंद्र सरकारलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मदतीसाठी आभार मानून, सध्या गरजेनुसार लसींचा आणि इतर गोष्टींच्यासाठी मदत मागितली आहे. सोबतच, लसीकरण केंद्रावरती गर्दी न करण्याचे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले. लसीकरण केंद्र हे करोना संक्रमणाचे केंद्र बनु नये याची त्यांनी चिंता व्यक्त केली.