नाशिक अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमध्ये खासगी बसचा भीषण अपघात होऊन बसला आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत तब्बल 10 ते 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे तसेच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, नाशिक बस अपघाताची सखोल चौकशी केली जाईल. चौकशीअंती दोषींवर कारवाईही करु, परंतु त्यापूर्वी आत्ता जे जखमी आहेत त्यांना आधी योग्य उपचार करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींवरचा उपचाराचा खर्च सरकारकडून करण्यात येणार आहे, तर मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

दरम्यान, नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा भीषण अपघात झाला. ट्रक आणि बसच्या या अपघातानंतर बसने जागीच पेट घेतला. यामध्ये १० ते १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे.