हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकासआघाडी सरकारचा दुसरा आणि करोना काळानंतरचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आपल्याला अपेक्षित येणं किती होतं आणि प्रत्यक्षात आलं किती याची आकडेवारी सांगितली आहेच. पण केंद्र सरकारकडून किती येणं आहे हे देखील सगळ्यांना माहिती आहे. पण रडगाणं न गाता आर्थिक परिस्थितीचा सामना करत समाजातल्या सर्व थरांना आधार देणारा आणि त्याच बरोबरीने राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प सरकारच्या वतीने अर्थमंत्र्यांनी मांडला आहे. त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो”, असं उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
कोरोना महामारीमुळं हे वर्ष आव्हानात्मक आहे. कोणतेही रडगाणे न गात जिद्दीने महाराष्ट्र थांबला नाही. थांबणार नाही, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, महिलांना आपल्या पायावर स्वाभिमानाने उभे करत आहोत. कृषी, शिक्षण, उद्योग या प्रत्येक क्षेत्राला गती देण्याचे काम केले, असं ते म्हणाले. राज्यातील जनतेचा माता भगिनी आशीर्वाद आहे. त्याला धक्का लागू देणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’