हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पाऊस पडत असून महापुराचे संकट आले आहे. दरम्यान , राज्यावर अनपेक्षित असं हे संकट आलं आहे. हवामान खात्यानं अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता आपल्याला आता काही शब्दांची व्याख्याच बदलावी लागेल. कारण, त्यापलीकडं जाऊन सगळं घडत आहे. अतिवृष्टी हा शब्दही थिटा पडेल इतका पाऊस होत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटल
राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले कि, गेल्या तीन ते चार दिवसांपासून मी राज्यातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही काल मला दूरध्वनी आला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार नौदल, तटरक्षक दल आणि आपत्ती निवारण पथकाच्या (NDRF) तुकड्या राज्यात पोचल्या आहेत
दरडी कोसळताहेत. नद्या फुटताहेत. मात्र, या सगळ्या संकटाला आपण धैर्यानं सामोरं जात आहोत.धरणं भरली असल्यामुळं पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. ते पाणी कुठं जाईल हे लक्षात घेऊन नागरिकांना स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अन्न व पाण्याचा पुरवठाही लवकरात लवकर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटल
जिथं सर्वाधिक पाऊस झालाय, त्याच भागात करोनाचा संसर्गही मोठा आहे. त्यामुळं जीव वाचवण्याला सध्या आपलं प्राधान्य आहे.असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. पुरात अडकलेल्यांना वाचवण्यावर व नदी परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरावर भर देण्यात येत आहे. डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावं लागणार आहे. त्याचवेळी लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावं,” असं मत उद्धव ठाकरेंनी यावेळी मांडलं.