हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. तसेच कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात आंदोलन सुरू आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना साद घालत भावनिक आवाहन केले आहे. कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, आंदोलन करू नका अशी कळकळीची विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटल.
माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका ,कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, आंदोलन करू नका असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.