मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी; डॉक्टरांची माहिती

0
101
uddhav thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मानदुखीचा त्रास वाढल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची डॉक्टरांनी दिली आहे. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया सुरु करण्यात आली होती. डॉक्टरांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आठवडाभर विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.

मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सकाळी साडेसात वाजचा मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया सुरू झाली होती. तासभर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तर आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुढच्या आठवड्यात उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी सुरू होणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.

दरम्यान, रुग्णालयात दाखल होत असताना उद्धव ठाकरे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलंय. या निवेदनात त्यांनी म्हटलं होत की, दोन वर्षांपासून आपण कोव्हिडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. कामादरम्यान, मान वर करायला सुद्धा वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. आपण आजच हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहोत,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here