भाजपाच्या मंत्र्याने करोडो रुपये खाल्ले, मंदिराचीही जमीन हडपली; नवाब मलिक यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून ड्रग्ज प्रकरणी भाजपवर गंभीर आरोप केले जात आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपवर पुन्हा निशाणा साधला. “एसीबीच्यावतीने ठिक ठिकाणी छापेमारी केली जात आहे. भाजपाच्या मंत्र्याने करोडो रुपये खाल्ले आहेत. भाजपाच्या एका नेत्याने मंदिराची जमीन हडपली आहे. भाजपाने अजून किती घोटाळा केला आहे. हे सांगणार आहे,” असा आरोप मलिक यांनी केला.

नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कालपासून वक्फ बोर्डाच्या जमीनीवर अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. मी इडीच्या लोकांना आवाहन करतो की, अफवा पसरवण्याचे काम बंद करावे. आणि आम्ही आतापर्यंत सात प्रकरणात पहिल्यांदा एफयाआर दाखल केला आहे. अशात आता भाजप दावा करत आहे की घोटाळा बाहेर काढू. मात्र, मला अपेक्षा आहे की, यात इडी देखील मला सहकार्य करेल.

कंगना राणावत हिने देशाचा अपमान केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.

You might also like