वसंत मोरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन; शिवसेना प्रवेशाची दिली ऑफर

0
121
vasant more uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता अन्य पक्षानी वसंत मोरे यांच्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना ऑफर दिल्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे याना फोन करत शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे वसंत मोरे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.

उद्धव ठाकरे यांनी स्वतः वसंत मोरे याना फोन करून तुम्ही शिवसेनेत येण्याबाबत विचार करा असे म्हंटल आहे. थेट मुख्यमंत्र्यांनीच वसंत मोरे यांना थेट फोन केल्यामुळे पुण्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. वसंत मोरे यांनी अद्याप कोणताही विचार केला नसला तरी ते आगामी काळात मनसेतच राहणार का शिवसेनेत जाणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने वसंत मोरे याना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती. वसंत मोरे राष्ट्रवादीत आले तर त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले होते. मात्र, खुद्द वसंत मोरे यांनी आपण मनसे सोडणार नसल्याचंही जाहीर केलं आहे. मी मनसेतच राहणार असे त्यांनी सांगितले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here