हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे माझी 2 खाती त्यांना दिली. नगरविकास खात्यासारखे महत्त्वाचे खाते दिले. मी त्यांना काय कमी केलं?? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर थेट टीका केली.
काही बंडखोर म्हणतात की, त्यांना माझ्या आवतीभोवती असणाऱ्या बडव्यांचा त्रास होतोय. आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे चालतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. तुम्हाला तुमच्या मुलाला मोठं करावसं वाटतं मग मला वाटणार नाही का?, असा सवाल उद्धव ठाकरेंना केला.
संजय राठोड यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले, पण तरीही मी त्यांना सांभाळले अस उद्धव ठाकरे म्हणाले. हिंमत असेल तर इथून पुढे शिवसेना आणि ठाकरे हे नाव न वापरता जागून दाखवा अस खुल आव्हान मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना दिले