हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील दहीहंडी सणावर घातलेल्या निर्बंधावरून विरोधकांनी ठाकरे सरकार वर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आंदोलन करायची खुमखुमी असेल तर कोरोना विरोधात आंदोलन करा असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांटचे लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सध्या दहीहंडीच्या उत्सवावरुन व मंदिरे उघडी करण्यावरून आंदोलने सुरु आहेत. मात्र, हे कोणतेही स्वातंत्र्य युद्ध नसून ते मिळालेच पाहिजे असे नाही. अस म्हणत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फटकारले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात सतर्कता बाळगा अस पत्र केंद्रानेच पाठवलं आहे त्यामुळे आम्ही हिंदू विरोधी किंवा सण साजरे करण्या विरोधात नाही असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.