लॉकडाऊन करायचा की नाही हे मी पुढचे आठ दिवस पाहणार ; मुख्यमंत्र्यांचा अल्टिमेटम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आणि लोकांना संभोधित केलं.

लॉकडाऊन करायचा का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, लॉकडाऊन करायचा का मी पुढचे आठ दिवस पाहणार. ज्यांना नकोय ते मास्क घालून फिरतील आणि ज्यांना हवाय ते विना मास्क फिरतील असं म्हणत मास्क घाला आणि लॉकडाऊन टाळा असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

इथून पुढे सर्व सामाजिक, धार्मिक, आंदोलनं, यात्रा यावर पूर्णपणे बंदी तसेच उद्यापासून मिरवणूक, आंदोलने, यात्रांवर बंदी घाला अस सांगतानाच पक्ष वाढवायचा आहे तर जरुर वाढवा, पण कोरोना नका वाढवू असा टोला मुख्यमंत्र्यांनी इतर पक्षांना लगावला.

तसेच, मी जबाबदार ही नवीन मोहीम सुरु झाली असून, मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा या तीन गोष्टी कराच, असे त्यांनी यावेळी सांगितले. मास्क घालणे अनिवार्य आहे. शिस्त पाळणे हे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा. नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई होणार, असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. तुम्हाला लॉकडाऊन हवे की नको, हे तुम्हीच ठरवा, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’