हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात 3 पक्षांचे सरकार असतानाही योग्य प्रकारे समन्वय साधून आणि भाजप सारखा बलाढ्य विरोधकांचा सामना करत महाराष्ट्राचा गाडा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम क्रमांक आला आहे. प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यात देशातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. द प्रिंटने त्याबाबत बातमी दिली आहे.
या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांची कामगिरी 49 टक्के मतदारांनी कामगिरी चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे. त्यांच्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 44 टक्के मतं मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत असून त्यांना 40 टक्के मतं मिळाली आहेत.
दरम्यान, लोकप्रिय नसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले, तरी पुन्हा मत देण्यास इच्छूक नसल्याचे म्हटले आहे. पंजाबमध्ये ६० टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब असल्याचे सांगितले.