हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. आज (१ सप्टेंबर) संध्याकाळी ७.३० वाजता मुख्यमंत्र्यांसह महाविकासआघाडीचे प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल होणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख नेते आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन १२ आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर चर्चा करतील. खर तर ही भेट मागील आठवड्यात २६ तारखेला ही भेट होणार होती. मुख्यमंत्री यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. पण राज्यपाल चार दिवस महाराष्ट्राच्या बाहेर दौऱ्यावर गेले होते.
दरम्यान, गेल्या काही महिन्यापासून १२ आमदारांच्या नियुक्ती वरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये संघर्ष पाहण्यास मिळाला. अखेर हा वाद हायकोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने हा निर्णय लवकर घेतला पाहिजे, असं मत नोंदवल होते. अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेट घेण्यासाठी आमंत्रण पाठवली आणि याच पार्श्वभूमीवर आज हे भेट होणार आहे.