हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (CNG Maruti Cars) वाढत्या किमती पाहता अलीकडच्या काळात अनेक ग्राहकांची पसंती CNG वाहनाकडे वळला आहे. स्वस्तात मस्त प्रवास करण्यासाठी CNG गाड्या उपयुक्त ठरत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादन कंपन्यांनी गेल्या वर्षभरात अनेक CNG गाड्या बाजारात आणल्या आहेत. तुम्ही सुद्धा नव्या वर्षात CNG कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या 4 गाड्यांबाबत सांगणार आहोत ज्या सर्वोत्तम मायलेज सह चांगला ड्रायविंग अनुभव सुद्धा देतात. चला जाणून घेऊया….
मारुती सुझुकी स्विफ्ट- Maruti Suzuki Swift
मारुती स्विफ्टचे सीएनजी मॉडेल (CNG Maruti Cars) नुकतेच लाँच करण्यात आले आहे. या कारला 1.2-लिटर K-Series Dualjet इंजिनमिळते. जे 77 PS पॉवर आणि 98 Nm टॉर्क जनरेट करते. या कारच्या मायलेजबद्दल सांगायचं झाल्यास, 1 किलो सीएनजीमध्ये मारुती सुझुकीची स्विफ्ट 31 किमी मायलेज देते. मारुतीच्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये स्विफ्टची नेहमीच वेगळी ओळख राहिली आहे.
मारुती सुझुकी डिझायर- Maruti Suzuki Dzire
मारुती सुझुकी Dzire मध्ये 1.2L 12C Dualjet इंजिन मिळते जे 76 BHP पॉवर आणि 98 Nm टॉर्क जनरेट करते. मायलेजचा विचार केला तर (CNG Maruti Cars) डिझायरचे सीएनजी मॉडेल 31 कि.मी. प्रति किलो मायलेज देते, तर पेट्रोल मॉडेल 20 किमी मायलेज देते.
मारुती वॅगन आर- Maruti Wagon R (CNG Maruti Cars)
मारुती सुझुकीची वॅगन आर ही नेहमीच (CNG Maruti Cars) कंपनीची सर्वाधिक जास्त विकली जाणारी कार राहिली आहे. वॅगन आर तिच्या दमदार मायलेज मुळे कायमच ग्राहकांची मुख्य पसंती ठरली आहे. वॅगनआर (CNG Maruti Cars) दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनी यामध्ये 1.0 आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देते. WagonR चे CNG मॉडेल 1.0-लिटर इंजिनसह येते. WagonR च्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, ती 1 किलो CNG वर ही कार तब्बल 34 किमी धावू शकते.
मारुती सुझुकी अल्टो -Maruti Suzuki Alto
मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या कारपैकी एक म्हणजे अल्टो. देशातील अनेक ग्राहक अल्टो ला सुद्धा पसंती देतात. अल्टो मध्ये 800 cc 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 41 पीएस पॉवर आणि 60 Nm टॉर्क जनरेट करते. मायलेजच्या बाबतीत सांगायचं झाल्यास 1 किलो CNG मध्ये ही कार 31.59 किलोमीटरचे दमदार मायलेज देते.
हे पण वाचा :
Hatchback Car : 10 लाखाच्या आत खरेदी करा या हॅचबॅक कार
Auto Expo 2023 : देशातील पहिली Solar Electric Car! 45 मिनिटांत फुल्ल चार्ज; 250 किमी रेंज
लवकरच लॉन्च होणार Maruti Wagon R चे Electric व्हर्जन; काय असेल किंमत?
Auto Expo 2023 : मारुती सुझुकीची JIMNY नव्या अवतारात सादर; आजपासून Booking सुरु