Coastal Road Maharashtra : महाराष्ट्राच्या औद्योगिक, आर्थिक तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक मोठमोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. विशेषतः इतर राज्यांना आणि उर्वरित महाराष्ट्राला राजधानी मुंबईशी कनेक्टिव्हीटी सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय मुंबईतील वाहतूक सुरळीत याकरिता नवे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आता महाराष्ट्राचा असाच एक प्रकल्प आता चक्क चीन चा रेकॉर्ड मोडणार आहे.
नरीमन पॉईंट ते विरार प्रवास फक्त 40 मिनिटांत
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उभारला जात असलेला कोस्टल रोड हा जगातील सर्वात मोठ्या कोस्टल रोडपैकी(Coastal Road Maharashtra) एक ठरणार आहे. चीनचा रेकॉर्ड मोडत, महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक प्रकल्प वाहतुकीसाठी नवे युग सुरू करणार आहे. यामुळे नरीमन पॉईंट ते विरार प्रवास फक्त 40 मिनिटांत होणार आहे.सध्या या मार्गासाठी 1.5 ते 2 तासांचा वेळ लागतो. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात या भव्य प्रकल्पासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
कोस्टल रोड विस्तार (Coastal Road Maharashtra)
मुंबईच्या दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत म्हणजे नरीमन पॉईंटपासून दहिसरपर्यंत हा रस्ता टप्प्याटप्प्याने विकसित केला जात आहे.
पहिला टप्पा शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) पूर्ण. नुकत्याच लोकार्पण झालेल्या कोस्टल रोड आणि सी लिंक जोडणाऱ्या पुलामुळे मरीन ड्राइव्ह ते वांद्रे प्रवास फक्त 15 मिनिटांत शक्य झाला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू
मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंक हा महाराष्ट्रातील पहिला सागरी सेतू होता. आता वांद्रे ते वर्सोवा दरम्यान दुसरा मोठा सी लिंक उभारला जात आहे.
याला “स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू” असे नाव देण्यात आले आहे. 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण (Coastal Road Maharashtra) करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पूर्ण झाल्यावर वांद्रे ते वर्सोवा अवघ्या 10 मिनिटांत पार करता येईल. मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाचा दहिसरपर्यंत विस्तार होणार आहे.
पहिला टप्पा: वांद्रे ते वर्सोवा सी लिंक (स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू)
दुसरा टप्पा: वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडशी जोडणी
तिसरा टप्पा: भाईंदर, विरार आणि पालघरपर्यंत विस्तार
हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यावर मरीन ड्राइव्ह ते दहिसर प्रवास 45 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
महाराष्ट्राच्या अधुनिक वाहतुकीचा नवा अध्याय सुरु होणार असून मुंबईच्या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून कोस्टल रोड महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे. पर्यायाने इंधन वाचणार, वेळ वाचणार आहे. याशिवाय पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.