आघाडीच्या फक्त ४० जागा निवडून येतील; चंद्रकांत पाटील यांचे भाकीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे.सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांचा पूर्ण वचपा काढण्याची एक ही संधी सोडताना दिसत नाही आहेत. सत्ताधारी विरोधक दोन्ही एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आता प्रचारात पुढे सरसावले आहेत. प्रत्येक जण विजय आपलाच होणार असल्याचा विश्वास दर्शवत आहेत.

दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादी वर टीकास्त्र सोडले आहे. ‘येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेस , राष्ट्रवादी आघाडीच्या फक्त ४० जागा असतील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ही त्यांना मिळणार नाही’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार प्रकाश अबीटकर यांच्या प्रचारार्थ तुरंबे येथील आयोजित जाहीर सभेत बोलत होते. ‘विरोधकांची ही शेवटची निवडणूक असून विरोधक शिल्लक राहणार नाहीत’असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी आघाडीला मिळणाऱ्या जागांचे भाकीत किती खरे ठरणार हे येत्या २४ तारखेलाच कळणार.

इतर काही बातम्या-