सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
आम्ही नारळ वाढवतो ते कामाचे वाढवितो. नारळ वाढविणे ती एक प्रथा, परंपरा आहे. आम्ही कधी कुणाची घरे फोडली नाहीत. ज्या लोकांनी स्वताः च्या आयुष्याची पुंजी, आयुष्याची कमाई विश्वासाने घराण्याकडे बघून तुमच्या बॅंकात ठेवली. त्यांची काय अवस्था आहे. आम्ही कोणती घरफोडी केली नाही, वाटोळ केल नाही, असे म्हणत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर खा. छ. उदयनराजे भोसले यांनी सडकून टीका केली.
कास (ता. सातारा) येथे बामणोली रस्ता भूमिपूजन, कास धरणाची घळभरणी आणि धरणाचे पाणी सोडण्याच्या स्वयंचलित गेटचे पूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा सभापती स्मिता हादगे, सुहास राजेशिर्के, किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, सुनिल काटकर, अॅड. डी. जी. बनकर यांच्यासह प्राधिकरण, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/931481834155505
खा. उदयनराजे म्हणाले, काही काम झालं, की आम्ही केल म्हटले जाते. वय वाढल पण यांची बुध्दी लहान मुलांपेक्षा कमी होत गेलेली आहे. नारळफोडी गॅंग हो आम्हांला सार्थ अभिमान आहे. आम्ही काम करतोय, लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. कामे केली म्हणून आम्ही नारळ फोडतो. एवढ्या वैयक्तिक पातळीवर जाणे मी कमी समजतो. परंतु दिशाहीन झालेले अत्यंत सकुंचित वृत्तीची काही लोक असतात. त्याच्याकडून फार अपेक्षा करणे हे त्याच्यावर अन्याय केल्यासारखे असते.