एलन मस्कची Starlink भारतात देणार स्वस्त इंटरनेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एलन मस्कची कंपनी स्टारलिंक लवकरच भारतात इंटरनेटच्या जगात प्रवेश करू शकते. स्टारलिंकच्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर करण्यात भारत सरकार गुंतले आहे.

दूरसंचार विभाग- DoT (Department of Telecommunication) ने सॅटेलाईटवर-आधारित ब्रॉडबँड सर्व्हिस सुरू करण्यासाठीची मंजुरी प्रक्रिया सुलभ करण्यास सुरुवात केली आहे. एलन मस्कची स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स आणि भारती ग्रुप समर्थित OneWeb या दोन मोठ्या कंपन्या देशात ब्रॉडबँड आणि इतर सेवा सुरू करणार आहेत.

दूरसंचार विभागाने काय म्हटले?
सॅटकॉम इंडस्ट्री असोसिएशनच्या कार्यक्रमात DoT चे उपमहासंचालक एस. निरानियन म्हणाले कि,”आम्ही सॅटेलाईट नेटवर्कसाठीची प्रक्रिया देखील सुलभ करत आहोत जेणेकरुन कमीतकमी वेळ लागेल,” .

अलीकडेच, दळणवळण राज्यमंत्री, देवुसिंह चौहान यांनी संसदेत सांगितले की,”एलन मस्कच्या स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्सने दूरसंचार विभागामध्ये प्रायोगिक आणि चाचणी लायसन्ससाठी अर्ज केला आहे.” ते म्हणाले की,”स्टारलिंक इंडियाला तिची सेवा देण्यासाठी सर्व आवश्यक लायसन्स आणि अधिकृततेसाठी अर्ज करायचा आहे.”

स्टारलिंकपासून दूर राहण्याचा सल्ला
DoT ने स्टारलिंकला आवश्यक परवाना मिळवण्यापूर्वी सॅटेलाइट आधारित इंटरनेट सर्व्हिस बुक करण्यापासून परावृत्त करण्याचे निर्देश दिले आहेत. एलन मस्कच्या या कंपनीला भारतात सॅटेलाइट इंटरनेटचा परवाना अद्याप देण्यात आलेला नाही, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. अशा परिस्थितीत, लोकांनी त्यांच्या सर्व्हिसेसचे सबस्क्रिप्शन न घेण्याचे आवाहन केले आहे.

या महिन्यात, स्टारलिंकचे भारताचे संचालक संजय भार्गव यांनी सांगितले की,” ते ब्रॉडबँड आणि इतर सर्व्हिसेस देण्यासाठी 2022 च्या सुरुवातीला व्यावसायिक परवान्यासाठी अर्ज करतील.”

भार्गव यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले होते, “आम्हाला आशा आहे की, 31 जानेवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी परवान्यासाठी अर्ज केला असेल.” दरम्यान, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने टेलीकॉम आणि ब्रॉडकास्टिंग सेक्टरमधील व्यवसाय सुलभतेच्या चर्चा पेपरमध्ये सर्व परवानग्या ऑनलाइन करणे आणि सिंगल विंडो स्थापित करण्याबाबत मते मागवली आहेत.

परवडणाऱ्या किंमतीत इंटरनेट
SpaceX ही SpaceX, Starlink च्या मालकीची सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. Starlink ही सर्व्हिस बाकीच्या आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा कमी किंमतीत भारतात देईल. असे म्हटले जात आहे की, स्टारलिंक भारतात अत्यंत कमी दरात सब्सक्रिप्शन प्लॅन ऑफर करेल. सुरुवातीला, कंपनी भारतातील अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहे, जिथे इंटरनेट सेवेस मिळणे खूप कठीण आहे.

Leave a Comment