हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे माजी आ.हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यामुळे हर्षवधन जाधव यांच्या अडचनीत वाढ झाली आहे.
दरम्यान हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या प्लॉट शेजारी एका व्यक्तीची टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी जाधव यांनी त्या व्यक्तीला जातीवाचक शिव्या आणि धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. जिल्ह्याच्या राजकारणात सतत वादग्रस्त ठरलेले जाधव यांचा अटकपूर्व जमीन फेटाळला असून त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.
गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी जाधव यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता, सहाय्यक लोकाभियोक्ता अजीत अंकुश यांनी गुन्ह्याचा तपास प्राथमिक अवस्थेत असुन आरोपीला जामीन दिल्यास तो फीर्यादीवर दबाव आणु शकतो. त्यामुळे अरोपीला जामीन देण्यात येवु नये अशी विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.